उत्तर आयर्लंड
उत्तर आयर्लंड : युनायटेड किंग्डम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड नॉर्दर्न आयर्लंड या देशाचा एक घटक. जलविभाग सोडून क्षेत्रफळ १३,४८४ चौ. किमी. लोकसंख्या १५,२५,१८७ (१९७१). आयर्लंड बेटाच्या ईशान्य भागातील अल्स्टर प्रांताच्या अँट्रिम, आर्मा, लंडनडेरी, डाऊन, फर्मॅना व टायरोन ह्या परगण्यांचा उ. आयर्लंडामध्ये समावेश होतो.